हैदराबाद गॅझेटियर जीआर विरोधातील याचिकांवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार...

<p>हैदराबाद गॅझेटियर जीआर विरोधातील याचिकांवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार...</p>

मुंबई -  मराठा आरक्षणासंदर्भातील  हैदराबाद गॅझेटियर जीआरच्या विरोधातील याचिकांवर सुनावणी घेण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने तांत्रीक कारणामूळे नकार दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते - डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाच्या या भूमिकेमुळे आता मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे.
मराठा आंदोलक  मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण केले होते. यावेळी पाच दिवसांनंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्याची मागणी मान्य करत त्याबाबतचा शासन आदेश काढला  होता मात्र या आदेशाविरोधात २ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकांवर आज न्यायमुर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सुनावणीस नकार दिला आहे. तांत्रिक कारणांमुला खंडपीठाने हा निर्णय घेतलाय. यामुळे हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे.