आदमापुरातील बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्षांना मारहाण...व्हिडीओ व्हायरल
कोल्हापूर – कोल्हापुरातील श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूर येथील संत बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्षांना मारहाण झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
कार्याध्यक्ष पदाचे कामकाज करण्याच्या विरोधात 25 ते 30 जणांनी शिवीगाळ करत त्यांना मारल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे.