संत बाळूमामा मंदिर विश्वस्त मंडळावर गंभीर आरोप

 

श्री. संत बाळूमामा मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्तीची मागणी

<p>संत बाळूमामा मंदिर विश्वस्त मंडळावर गंभीर आरोप</p>

कोल्हापूर – भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांनाच श्री. संत बाळूमामा मंदिरावर विश्वस्त म्हणून नेमले जाते, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर दिले जात नाहीत, भाविकांना तसंच मंदिराची बकरी सांभाळणाऱ्या मेंढपाळांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत, असे गंभीर आरोप पत्रकार बैठकीत  श्री. हालसिध्दनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी केली आहे.

मंदिराची ५५ हजार बकरी आहेत पण, प्रवासात गुदमरून बकरी मेली असं सांगून मंदिराच्या बकऱ्यांची परस्पर विक्री केली जाते, त्यामुळे हे विश्वस्त मंडळ बरखास्त करुन प्रशासकांची नेमणूक करावी अशी त्यांनी  मागणी केली आहे. या मागणीसाठी रविवारी सकाळी अकरा वाजता मुदाळ तिठ्ठा ते श्री.बाळूमामा मंदिर घंटानाद मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निखिल मोहिते यांनी सांगितले आहे.

दरम्यान या घंटानाद मोर्चा नंतर आठ दिवसाच्या आत प्रशासनाने बाळू‌मामा मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त केले नाही तर सेवेकरी ग्रुपच्या वतीने मंदिराच्या आवारात आमरण उपोषण करु, असा इशारा मोहिते यांनी दिलाय. या पत्रकार बैठकीला महंतेश नाईक, संजय शेंडे, सागर पाटील, संतोष दाईंगडे आदी उपस्थित होते.