शाहूपुरीतल्या पंचमुखी गणेश मंदिराचा जीर्णोद्धार होणार...
कोल्हापूर - शहरातील शाहूपुरीतील पाचव्या गल्लीत पंचमुखी गणपतीचे जुने मंदिर आहे. शहरातील या एकमेव पंचमुख गणेश मंदिरात दरवर्षी पुष्टीपती विनायक जयंतीला विविध धार्मिक विधी संपन्न होतात. या दिवशी दशभूजा पंचमुखी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. पंचमुखी गणेश सेवाभक्त ट्रस्टच्या वतीने या मंदिराचा लोक वर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. आज ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयसिंग बावडेकर आणि त्यांच्या पत्नी कल्पना बावडेकर यांच्या हस्ते भूमीपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील पाटील, उदय कुंभार, ओंकार पाटील, सतीश बावडेकर, शुभम कुंभार, तेजस जाधव, संभाजी आरेकर, अरविंद जाधव यांच्यासह ट्रस्टचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि गणेश भक्त उपस्थित होते.