श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी – आठ दिवसांत १२ लाखांहून अधिक भक्तांनी घेतलं दर्शन
कोल्हापूर : साडेतीन शक्तीपाठांपैकी एक असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गेल्या आठवड्याभरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. तब्बल 12,15,447 भाविकांनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. गेल्या आठ दिवसांत –
शनिवार, 18 ऑक्टोबर: 37,105
रविवार, 19 ऑक्टोबर: 39,105
सोमवार, 20 ऑक्टोबर: 65,107
मंगळवार, 21 ऑक्टोबर: 62,017
बुधवार, 22 ऑक्टोबर: 77,128
गुरुवार, 23 ऑक्टोबर: 2,42,016
शुक्रवार, 24 ऑक्टोबर: 2,91,206
शनिवार, 25 ऑक्टोबर: 1,87,253
रविवार, 26 ऑक्टोबर: 2,14,510
या कालावधीत मंदिर परिसर, महाद्वार रोड आणि कोल्हापूर शहरातील विविध परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महापालिका, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून वाहतूक व व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी दूरदूरहून भाविक कोल्हापुरात येत असून, या काळात स्थानिक हॉटेल व्यवसाय, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली आहे.