आज अंबाबाई देवीला ५६ भोग नैवेद्य अर्पण...
५६ भोग नैवेद्य अर्पण सोहळा उत्साहात...

कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात विजयादशमीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ओटी भरत ५६ भोग नैवेद्य अर्पण केला जातो. या परंपरेनुसार आज दुपारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सुवासिनी महिलांच्या हस्ते ५६ भोग नैवेद्य वाजत गाजत मंदिरात आणण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईला ५६ भोग नैवेद्य आणि ओटी अर्पण करण्यात आली.
यावेळी विविध धार्मिक विधी संपन्न झाले. यावेळी देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, देवस्थान समितीचे कर्मचारी, महिला आणि भाविक उपस्थित होते.