मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच...
नृसिंहवाडी देवस्थानाकडून मदत सुपूर्द

शिरोळ – मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी देवस्थानासह अनेक संस्थांकडून पूरग्रस्तांना मदत दिली गेली आहे. त्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी देवस्थानाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपये सुपूर्द करण्यात आले आहेत. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी हा मदतीचा धनादेश स्वीकारला आहे.