दसऱ्याच्या निमित्ताने पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात असंख्य फुलांची आकर्षक सजावट...

पंढरपूर – आज विजया दशमी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यासाठी झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, ॲार्कीड, ऑथोरियम, सुर्यफूल, ब्लु डेजी, पिंक डेजी, कमिनी, अशोकाची पाने, जिप्सो, मनीप्लांट, ड्रेसिना अशा असंख्य फुला आणि पानांचा वापर करण्यात आला आहे. पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी ही मनमोहक सजावट केली आहे.