आज अंबाबाई देवीची भैरवीमाता रूपातील पूजा 

<p>आज अंबाबाई देवीची भैरवीमाता रूपातील पूजा </p>

कोल्हापूर – आज अंबाबाई देवीची भैरवीमाता रूपातील पूजा बांधण्यात आली आहे. त्रिपुरभैरवी, कोलेशीभैरवी, रुद्रभैरवी, चैतन्यभैरवी, क्रियाभैरवी, सिद्धिभैरवी, कामेश्वरीभैरवी, षट्कूटाभैरवी आदि देवीचे उपासनाभेद आहेत.

हजारो उगवत्या सूर्याप्रमाणे जिचा प्रखर तेजस्वी वर्ण आहे.  जिच्या केशजटांमध्ये चंद्रकला शोभत आहे, रक्तचंदनरंजित जिच्या चारही हातात जपमाळा, ग्रंथ, अभय व वरदहस्त शोभत आहेत, जी त्रिनेत्री असून, मंदस्मित मुखमंडल आहे. ही दशमहाविद्यांमधील ५ वी देवता असून, कल्पभेदानुसार श्री दक्षिणामूर्ति अथवा श्री बटुकनाथ हे हिचे भैरव आहेत, मार्गशीर्ष पौर्णिमेस प्रगट झालेली, ही देवी श्रीकुलातील असून, उत्तराम्नायपीठस्था आहे.