चित्पावन संघाच्यावतीने श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा उत्साहात

कोल्हापूर - चित्पावन संघाच्या वतीने मंगलधाम येथे श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा उत्साहात पार पडला. सोहळ्यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी तुळशी पुजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर आरती वाचन, महानैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी प्रथेप्रमाणे तांदळाच्या उकडीपासून श्री महालक्ष्मीचा मुखवटा साकारण्यात आला. हा मुखवटा महेश गोखले , शुभम साने , अश्विनी भिडे , माधुरी करंदीकर आणि समाजातील माता-भगिनी यांच्या उपस्थितीत साकारण्यात आला. सायंकाळी जगदंबेची मूर्ती उभारण्यात आली. मूर्तीसमोर घागरी फुंकण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अध्यक्ष मकरंद करंदीकर, उपाध्यक्ष प्रसाद भिडे, केदार जोशी, नंदकुमार मराठे, संतोष साने, किरण जोशी, निखिल गोखले, ह्रषिकेश लिमये, दत्ता आपटे, सिमा गोखले यांच्यासह समाजातील वी फॉर अवर्स ग्रुपचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.