आज अंबाबाई देवीची महाकाली रुपात पूजा 

<p>आज अंबाबाई देवीची महाकाली रुपात पूजा </p>

कोल्हापूर – आज श्री अंबाबाई देवीची महाकाली रुपात पूजा मांडण्यात आली आहे. महाकाली देवीचे  मुख अत्यंत भीतीदायक असून, मुक्तकेशी, मुंडमाला धारण केलेली, चारहात असलेली डाव्या खालील हातात नुकतेच कापलेले नरमुंड व वरील हातात खड्ग उजव्या वरील हातात अभयदायी आशीर्वाद व खालील हात अभयमुद्रादर्शक आहे.

दक्षिणकाली, स्मशानकाली, संततिप्रदाकाली, स्पर्शमणिकाली, चिंतामणिकाली, भद्रकाली, कामकलाकाली, हंसकाली इ. हिचे प्रकार व उपासनाभेद आहेत.