पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात...

<p>पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात...</p>

पंढरपूर – मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना मदतीचा हात पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीकडून देण्यात आला आहे. समितीकडून  एक कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.
तसेच पूरग्रस्त नागरिकांना जेवण, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडू प्रसाद देण्यात येत आहे. मराठवाड्यातील संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व मंदिर समितींना मदत करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून प्रतिसाद मिळाला आहे.