श्री अंबाबाई देवीची आज "श्रीषोडशी त्रिपुरसुंदरी" रूपातील सालंकृत पूजा

<p>श्री अंबाबाई देवीची आज "श्रीषोडशी त्रिपुरसुंदरी" रूपातील सालंकृत पूजा</p>

कोल्हापूर – आज श्री अंबाबाई देवीची "श्रीषोडशी त्रिपुरसुंदरी" या दिव्य सालंकृत रूपात  पुजा बांधण्यात आली. देवीचं आजचं तेजस्वी, उगवत्या सूर्यासारखं स्वरूप विशेष भावविवश करणारं होतं. त्रिपुरसुंदरीच्या सौंदर्य व सामर्थ्याचं प्रतीक मानली जाणारी पाश,अंकुश, पंचबाण, उसाचा धनुष्य, ही आयुधं देवीच्या चार हातांत विराजमान होती. प्राचीन काळी भंडासुर नावाच्या दैत्याने त्राही-त्राही माजवली होती. देवतांनी महर्षी नारदांच्या सल्ल्यानुसार महात्रिपुरसुंदरीची तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येचा परिपाक म्हणून, माघ पौर्णिमेच्या दिवशी अग्निकुंडातून देवी प्रकट झाली. तिने भंडासुराचा संहार करून त्रैलोक्याचे रक्षण केले. ही देवी दशमहाविद्या परंपरेतील तिसरी महाविद्या आहे. तिचे 'ललितेश्वर' हे भैरवरूप आणि ती पूर्वाम्नाय पीठस्थ व श्रीकुल प्रमुख मानली जाते, अशी अख्यायिका आहे.

 

श्रीषोडशी ही देवी सोळा कलांनी परिपूर्ण आहे. ती सौंदर्य, ज्ञान, इच्छाशक्ती व कृपासागर मानली जाते. तिची उपासना तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावी आणि फलदायी मानली जाते. ही पूजा केल्याने सौंदर्य, सौभाग्य, आध्यात्मिक शक्ती, मनःशांती, मोक्षप्राप्ती, असे अनेक लाभ मिळतात, असे धर्मशास्त्रात वर्णन आहे. आजची ही दिव्य आणि शास्त्रसम्मत पूजा लाभेश मुनीश्वर, निलेश ठाणेकर आणि अर्चित यांनी बांधली.