सोमवारी चित्पावन संघाचा अष्टमी जागर सोहळा

कोल्हापूर - चित्पावन संघाच्या वतीने सोमवारी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त "श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा" आयोजित करण्यात आला आहे. चित्पावन संघाचं यंदाचं हे हीरक महोत्सव वर्ष आहे.
सोमवारी बिनखांबी गणेश मंदिरा जवळील मंगलधाम येथे सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत सोहळा होणार आहे. सोहळ्यामध्ये महापूजा, श्रींची कहाणी वाचन, आरती, महानैवेद्य,श्रीदेवी मूर्ती प्रतिष्ठापना यासह घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे संपूर्ण संयोजन संघाचे अध्यक्ष मकरंद करंदीकर , उपाध्यक्ष प्रसाद भिडे , कार्यवाह केदार जोशी , संतोष साने , निखिल गोखले , नंदकुमार मराठे , संगीता आपटे , सीमा गोखले सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी यांनी केले आहे.