आज श्री अंबाबाई देवीची भुवनेश्वरी देवी रूपातील पूजा 

<p>आज श्री अंबाबाई देवीची भुवनेश्वरी देवी रूपातील पूजा </p>

कोल्हापूर – आज पाचव्या दिवशी श्री अंबाबाई देवीची भुवनेश्वरी देवी रूपातील पूजा मांडण्यात आली आहे. 
अरुणोदया प्रमाणे जिचा शरीर वर्ण असून, मुकुटावर जिने चंद्र धारण केला आहे. जी त्रिनेत्रयुक्त असून, प्रसन्नमुखी आहे, जिने आपल्या वरील दोन हातात, वरदहस्त व अंकुश तर खालील दोन हातात अभय व पाशयुक्त आहेत.
आदिशक्ती, भुवनेश्वरी, ज्येष्ठा, रौद्री, शताक्षी, स्मेरमुखी आदि हिचे प्रकार व उपासनाभेद आहेत.