आज श्री अंबाबाई देवीची मातंगी मातेच्या रूपातील पूजा 

<p>आज श्री अंबाबाई देवीची मातंगी मातेच्या रूपातील पूजा </p>

कोल्हापूर - आज श्री अंबाबाई देवीची मातंगी मातेतील पूजा मांडण्यात आली आहे. आजची पूजा पूजक पुरुषोत्तम ठाणेकर, उमेश उद‌गांवकर, संतीष जोशी व अवद्युत गोरंबेकर यांनी बांधली.
भगवान शिव हे मतंग असून, त्यांनी त्रिपुरीची उपासना केली असता, त्यांच्या नेत्रतेजातून या देवीची उत्पत्ती झाली किंवा मतंगऋषींच्या कन्येच्या रुपात हिने अवतार घेतल्याने हिला 'मातंगी' म्हणतात. ही नववी महाविद्या असून, मतंग हे तिचे भैरव आहेत. ही श्रीकुलातील देवता उत्तराम्नायपीठस्था आहे. हिची उत्पती वैशाख शुद्ध तृतीयेस आहे.