नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी दख्खनच्या राजाची ‘नागवल्ली’ रूपातील महापुजा

कोल्हापूर - दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवाच्या नवरात्रोत्सवाला आजपासून धार्मिक आणि पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या माळेला जोतिबा देवाची नागवल्ली पानातील महापुजा बांधण्यात आली. धुपारती सोहळ्याने डोंगरावरील सर्व मंदिरात घट बसविण्यात आले. पुढील दहा दिवस जोतिबा डोंगरावरील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.