नवरात्र घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर वृक्षारोपणाचा सद्गुणी उपक्रम;  मांडेदुर्ग स्मशानभूमीत वडाच्या झाडाचे वृक्षारोपण

<p>नवरात्र घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर वृक्षारोपणाचा सद्गुणी उपक्रम;  मांडेदुर्ग स्मशानभूमीत वडाच्या झाडाचे वृक्षारोपण</p>

मांडेदुर्ग – नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेच्या पवित्र दिवशी, निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमी फाउंडेशनच्या वतीने मांडेदुर्ग येथील स्मशानभूमीत वडाच्या झाडाचे रोपण करण्यात आले. पर्यावरणसंवर्धनाच्या उद्देशाने घेतलेल्या या उपक्रमामुळे धार्मिक व सामाजिक मूल्यांना एकत्र बांधणारा एक स्तुत्य संदेश देण्यात आला आहे. या उपक्रमात वृक्षप्रेमी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामध्ये वृक्षप्रेमी दयानंद भोगण,कृष्णा धामणेकर, ज्ञानेश्वर रमेश पवार, अनिकेत धामणेकर, हर्ष किशोर पाटील, विठोबा भीमाना पाटील या सर्वांनी वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करून परिसर सुशोभित करण्यास हातभार लावला.

वडाचे झाड हे दीर्घायुषी, ऑक्सिजन समृद्ध, व धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले जाते. स्मशानभूमी सारख्या जागी वृक्षलागवड करून निसर्ग संवर्धनासोबतच समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी, वातावरण संरक्षण आणि धार्मिक आस्थेचा संगम साधला गेला आहे. निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमी फाउंडेशन यांच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी कौतुक केले असून भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.