कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचा उद्या भव्य शुभारंभ...

 

 शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि ‘गाथा शिवशंभूची’ ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन

<p>कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचा उद्या भव्य शुभारंभ...</p>

<p> </p>

कोल्हापूर -  जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचा शुभारंभ उद्या होणार आहे. दसरा चौक मैदान येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खा.श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळ ६ वाजता भव्यदिव्य सोहळा होणार आहे.

यावेळी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि सायंकाळी ‘गाथा शिवशंभूची’ ऐतिहासिक महानाट्य दसरा चौक मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आणि  शहरात दाखल होणाऱ्या सर्व भाविक - पर्यटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.