कोल्हापूरातील यात्री निवास संघटनेची सामाजिक बांधिलकी; नवरात्रोत्सव काळात महिलांची कुचंबणा टळणार

<p>कोल्हापूरातील यात्री निवास संघटनेची सामाजिक बांधिलकी; नवरात्रोत्सव काळात महिलांची कुचंबणा टळणार</p>

कोल्हापूर - दोनशे भाविकांची व्यवस्था असलेला यात्री निवास चालवणारे सतीश शाह यात्री निवास संघटनेच्या माध्यमातून नवरात्रोत्सव काळासह वर्षभर सामाजिक बांधिलकी जपतायत. उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून मंदिर परिसरातील यात्री निवासांमध्ये मोफत स्वच्छतागृह सेवा उपलब्ध करून दिली जातीय. भाविकांची दरवर्षी वाढती संख्या लक्षात घेता ही सुविधा अपुरी ठरतीय. त्यामुळं शहरातील धर्मशाळा, यात्री निवास, लॉजिंग आणि हॉटेल व्यावसायिकांनी भाविकांसाठी मोफत स्वच्छतागृह सेवा उपलब्ध करून द्यावी असं आवाहन श्री. करवीर निवासिनी भक्त आणि यात्री निवास संघटनेचे अध्यक्ष सतीश शाह आणि पत्नी कोमल शाह यांनी केलंय.

दरम्यान श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी नवरात्रोत्सव काळात कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी अन्नछत्र आणि स्वछतागृहाची सुविधा उपलब्ध असल्याचं सांगितलं.