नवरात्रोत्सव काळात रिक्षा, टॅक्सी, यात्री निवास, हॉटेल आणि भोजनालयांचे दर पत्रक जाहीर करण्याची मागणी
हिंदू जन संघर्ष समितीचे निवेदन

कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सव काळात राज्यातून आणि पर राज्यातून लाखो भाविक करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या काळात भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रिक्षा, टॅक्सी, यात्री निवास, हॉटेल आणि भोजनालयांचे शासकीय दर पत्रक जाहीर करावे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांच्या पार्किंगची योग्य ती व्यवस्था करावी. मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि प्रमुख चौकात मोबाईल स्वच्छता ग्रहांची व्यवस्था करावी. परगावच्या भाविकांना कोल्हापूरच्या धार्मिक स्थळांची, पर्यटन स्थळांची आणि कोल्हापुरी खाद्य पदार्थीची माहिती व्हावी, यासाठी प्रदर्शन भरवण्यात यावे, यासाठी आज हिंदू जन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार नम्रता चौगले यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी अभिजीत पाटील, आनंदराव पवळ, सुहास सामंत, कविराज कबुरे, राजेंद्र तोरस्कर, संभाजी थोरवत, महेश पवार, विजय सोनवणे, सुरेश जाधव, श्रीकांत पाटील उपस्थित होते.