श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सव काळात कायमस्वरूपी अखंड ज्योत प्रज्वलित ठेवण्याची मागणी

हिंदू जन संघर्ष समिती देवस्थान समितीचे निवेदन

<p>श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सव काळात कायमस्वरूपी अखंड ज्योत प्रज्वलित ठेवण्याची मागणी</p>

कोल्हापूर - शारदीय नवरात्र उत्सव काळात लाखो भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही भाविक  आणि विविध मंदिरांचे विश्वस्त मंडळ नवरात्र उत्सवाचे प्रतीक म्हणून ज्योत प्रज्वलित करण्यासाठी अंबाबाई मंदिरात येतात. या ठिकाणी दुर्गा ज्योत प्रज्वलित करून भाविक आपापल्या गावी नेतात आणि स्थानिक मंदिरामध्ये अखंड नऊ दिवस प्रज्वलित ठेवतात. मात्र परगावचे भाविक ज्योत प्रज्वलित करण्यासाठी येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होते. त्यामुळे श्री अंबाबाई मंदिरात एक ठिकाण निश्चित करून त्याठिकाणी नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित ठेवावी. यासाठी हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना  मागणीचे निवेदन दिले.

यावेळी अभिजीत पाटील, आनंदराव पवळ, सुनिल सामंत , कविराज कबुरे, राजेंद्र तोरस्कर, संभाजी थोरवत, अजय सोनवणे, सुरेश जाधव, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.