बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या... 

भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

<p>बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या... </p>

 

कोल्हापूर - बिहारमधील बोधगया मधील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मियांसाठी सर्वात पवित्र स्थळ आहे. कारण याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. या महाविहाराच्या व्यवस्थापना मध्ये बौध्द धर्मीयांना स्थान नसल्याने बौध्दधर्मीयां मध्ये अस्वस्थता आहे. महाबोधी मुक्ती आंदोलनाचा भाग म्हणून आज भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. १९४९चा बोधगया मंदिर कायदा रद्द करा, बोधगया मनुवादी ब्राह्मणांपासून मुक्त करा, बौद्धांची धार्मिक स्थळं अतिक्रमण मुक्त करा, अशा आशयाचे फलक घेऊन बौद्ध धर्मीय या मोर्चात सहभागी झाले होते.

दसरा चौकातून सुरु झालेला हा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरुन फिरुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली.

मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, संतोष भूयेकर, जनार्दन गायकवाड, बाबुराव एताळे, अरुण कांबळे, रेखा बनगे, श्रीकांत कांबळे आदींसह बौध्द भिख्खू सहभागी झाले होते.