‘या’ राज्यात बकरी ईदच्या काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास पूर्णपणे बंदी...
लखनऊ – येत्या बकरी ईदनिमित्त उत्तर प्रदेश सरकारने कडक निर्देश दिले आहेत. राज्यात बकरी ईद शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट आदेशात म्हटले आहे की, “बकरी ईदच्या काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास पूर्णपणे बंदी असेल. तसेच, कोणत्याही परिस्थितीत रस्ते अडवून नमाज पठण करता येणार नाही. बंदी असलेल्या प्राण्यांची कुर्बानी देणाऱ्यांवर ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहनशीलता) धोरणांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. जिल्हा प्रशासनाने केवळ आधीपासून निश्चित केलेल्या ठिकाणीच कुर्बानी देण्याची परवानगी द्यावी. कोणत्याही नवीन परंपरेला किंवा पद्धतीला परवानगी दिली जाणार नाही. नमाज पठण केवळ पारंपरिक आणि निश्चित केलेल्या धार्मिक स्थळांवरच केले जावे.