मकरसंक्रांतीनिमित्त विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास...
रूक्मिणी मातेला पारंपारिक अलंकार परिधान
पंढरपूर – आज मकरसंक्रांतीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यामध्ये गाभारा, चारखांबी, नामदेव पायरीला फुलाने आकर्षक आणि मनमोहक सजवण्यात आले आहे.
सजावटीत अमोल शेरे यांनी, 2000 शेवंती, 100 गुलाब गड्डी, बेंगलोर शेवंती 10, ऑर्किड 10, ग्रीनरी 30, कामिनी 300, भगवा झेंडू 100 किलो, पिवळा झेंडू 100 किलो व पांढरी शेवंती 50 किलो आदि फुलांचा वापर केला आहे.
तसेच श्री रूक्मिणी मातेला पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहे. त्यामध्ये सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, जवेच्या माळा, तांबडी चिंचपेटी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, जवमणी पदक, हायकोल, सरी, कंबरकट्टा, लक्ष्मीहार इत्यादी अलंकाराचा समावेश आहे.