आज संध्याकाळपर्यंत वाट पाहणार, अन्यथा तिसरी आघाडी करणार 

<p>आज संध्याकाळपर्यंत वाट पाहणार, अन्यथा तिसरी आघाडी करणार </p>

कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी व जागावाटपावरून तीव्र हालचाली सुरू असून, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून मतभेद उफाळून येत आहेत. अधिक जागा मिळवण्यासाठी पक्षांकडून नेतृत्वावर राजकीय दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आज संध्याकाळपर्यंत जागावाटपाबाबत निर्णय न झाल्यास उद्या तिसरी आघाडी स्थापन करण्याचा पर्याय पाहू, असा अल्टिमेटम देण्यात आला आहे.