नाशिकमध्ये पक्षप्रवेशावरून मंत्र्यासमोर मोठा राडा... भाजप कार्यालयाला छावणीचे स्वरुप

<p>नाशिकमध्ये पक्षप्रवेशावरून मंत्र्यासमोर मोठा राडा... भाजप कार्यालयाला छावणीचे स्वरुप</p>

नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विरोध असताना देखील मंत्री गिरीश महाजन यांनी 5 जणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे मंत्री महाजन यांच्यासमोरच मोठा राडा झाला आहे. यावेळी एकमेकांच्या अंगावर जात हायव्होल्टेज ड्रामा झाला. 

नाशिकमध्ये उद्धव सेनेला धक्का देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन विनायक पांडे, यतीन वाघ,  शाहू खैरे यांच्यासह 5 नेत्यांना भाजपमध्ये घेतले आहे. ठाकरे पक्षाच्या  2 बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशावरुन हा वाद झाला. या पक्ष प्रवेशामुळे भाजपात नाराजी पसरली आहे. 
या पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केला. त्याशिवाय काँग्रेसच्या शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशालाही विरोध होतोय. अशात  दोन्ही गट आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ झाला आहे. त्यामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.