‘तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं चुकीचं...’: खा. संजय राऊत संतापले
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तुलना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी करु नये असं म्हणत खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. राज ठाकरेंची तुलना अमित शाह यांच्याशी करु नका. तेव्हा त्यांनी बेईमान केली. त्यांनी शब्द पाळला नाही. ते बेईमान आहेत. तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं चुकीचं आहे," असं खा.संजय राऊत म्हणाले आहेत.
"भाजपा किंवा फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं? गोपीनाथ मुंडे सोडले तर कोणीही कधीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाहीत. बेळगाव - कारवार सीमेवर मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही. बाकी मला सांगा कोणत्या भाजपा नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अपमानाविरोधात आवाज उठवला. ना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, ना त्यांच्या सहकाऱ्यांनी, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? 10 कामं दाखवा," असं आव्हान त्यांनी दिले आहे.