भाजपच्या  ‘या’ तीन बड्या नेत्यांविरोधात अटक वॉरंट जारी...

<p>भाजपच्या  ‘या’ तीन बड्या नेत्यांविरोधात अटक वॉरंट जारी...</p>

सिंधुदुर्ग – संविधान बचाव आंदोलन केल्या प्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपचे  मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड  यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले  आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात  त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सिंधुदुर्गात राजन तेली,आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य 42 जणांवर आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी आज झालेल्या  सुनावणीस आमदार निलेश राणे आणि राजन तेली यांच्यासह अन्य आरोपी उपस्थित होते. मात्र, नितेश राणे यांच्यासह अन्य 5 जण गैरहजर होते. मंत्री नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याने न्यायालायाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच  न्यायालयाने अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्जदेखील  नाकारला आहे.