काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याने घेतला 88व्या वर्षी अखेरचा श्वास...
नंदुरबार – काँग्रेसचे नंदुरबारचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना सुरुपसिंग नाईक यांचे निधन झाले आहे. ते 1981 ते 2019 पर्यंत राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. गांधी परिवाराबरोबर त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असून विश्वासू सहकारी म्हणून नाईक यांची ओळख होती.