‘...तर मी राजीनामा देईन’ : पवार गटाच्या शहराध्यक्षांनी केलेल्या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादीत गोंधळ
पुणे – पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला टक्कर देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
निवडणुकीसाठी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जोरदार विरोध केला आहे. “पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर, मी राजीनामा देईन”, असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे.