कोल्हापूर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर आज ७८ तक्रारी; एकूण तक्रारींचा आकडा ३१० वर...

<p>कोल्हापूर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर आज ७८ तक्रारी; एकूण तक्रारींचा आकडा ३१० वर...</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांकडून तक्रारींचा ओघ वाढत आहे. आज दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी विभागीय कार्यालयांत एकूण ७८ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून आतापर्यंत प्राप्त तक्रारींचा एकूण आकडा ३१० वर पोहोचला आहे.


▶️आज वैयक्तिक प्रकारच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून नागरिकांच्या वैयक्तिक स्वरूपातील तक्रारींमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे :
१) मतदार यादीत नाव असूनही कोणत्याही प्रभागात नाव समाविष्ट नसल्याच्या तक्रारी – 0
२) नाव चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्यामुळे योग्य प्रभागात दाखल करण्याच्या तक्रारी – ३७
३) विधानसभा मतदार यादीत नाव नसताना प्रभागनिहाय यादीत झालेल्या समावेशाबाबत तक्रारी – ०
४) नाव, लिंग अथवा टंकलेखनातील त्रुटी दुरुस्तीबाबत तक्रारी – ०

▶️इतर मतदारांबाबतच्या हरकती....
१) विधानसभा यादीत नाव असूनही चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याबाबतच्या तक्रारी – ३९
२) विधानसभा यादीत नाव नसूनही प्रभागनिहाय यादीत समावेश झाल्यामुळे वगळण्याच्या तक्रारी – 0

▶️वरील प्रकारांव्यतिरिक्त इतर हरकती – 0

▶️विभागनिहाय तक्रारींचा आढावा...
विभागीय कार्यालय क्र. १  मध्ये २४ तक्रारी
विभागीय कार्यालय क्र. २ मध्ये १४ तक्रारी
विभागीय कार्यालय क्र. ३  मध्ये २९ तक्रारी
विभागीय कार्यालय क्र. ४  मध्ये ११ तक्रारी

महापालिका प्रशासनाने सर्व तक्रारींची पडताळणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. नागरिकांना योग्य पुराव्यांसह तक्रारी सादर करण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.