उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ...
महत्वाचे दस्तऐवज घेवून अंजली दमानिया निघाल्या दिल्लीला...
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील कागदपत्रांसह अन्य महत्त्वाचे असे एकूण 21 किलो वजनाचे दस्तऐवज घेवून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया दिल्लीला रवाना झाल्या आहेत. त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात जमा केलेले सर्व पुरावे आणि कागदपत्रं त्या अमित शाह यांच्याकडे सादर करणार आहेत. या दस्तऐवजांमध्ये पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा तपशील व इतर तब्बल 69 फाईल्स समाविष्ट आहेत. अमित शाह यांच्या कार्यालयाशी दमानियांनी संपर्क साधला असून, उद्यापर्यंत भेटीची वेळ मिळण्याची शक्यता आहे.