भाजप सारख्या फसव्यांवर विश्वास ठेऊ नका, नाही तर...: आ. सतेज पाटील
कोल्हापूर – भाजप सारख्या फसव्यांवर विश्वास ठेऊ नका, नाही तर पाच वर्षे मनस्ताप होईल, असे वक्तव्य आ. सतेज पाटील यांनी केले आहे. कुरुंदवाडमधील कोपरा सभेत ते बोलत होते.
कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह मित्र पक्ष एकत्र येत निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नुकत्याच कुरुंदवाडमधील प्रत्येक प्रभागात कोपरा सभा घेतल्या. यावेळी कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, व्ही के पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, विजय पाटील, अजय पाटील, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगीनी पाटील यांच्यासह उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, कुरुंदवाडच्या शाश्वत विकासासाठी काँग्रेस, स्वाभिमानी आणि मित्र पक्षांच्या आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिनी पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केले. काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्र पक्षांकडून नगराध्यक्ष पदासाठी योगिनी विजय पाटील तर नगरसेवकपदासाठी प्रभाग क्रमांक १ मधून सचिन मोहिते, सेजल कोळेकर, प्रभाक क्रं २ मधून दीपक परीट आणि अलका पाटील, प्रभाग क्रं ३ मधून तानाजी आलासे आणि स्नेहाली गुदले, प्रभाग क्रं ४ मधून शशिकांत तोबरे आणि नौशाद माणगावे, प्रभाग क्रं ५ मधून स्मिता घोरपडे आणि प्रफुल्ल पाटील, प्रभाग क्रं ६ मधून सुजाता जाधव आणि अदीब मुजावर, प्रभाग क्रं ७ मधून आयेशा बागवान आणि प्रविण चव्हाण, प्रभाग क्रं ८ मधून रुकसाना बागवान, प्रभाग क्रं ९ मधून लक्ष्मीबाई आवळे आणि संदिप बोटे, प्रभाग क्रं १० मधून बशिरा फकीर आणि विशाल पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.