आम्ही विकासाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही : आ. सतेज पाटील यांची ग्वाही

<p>आम्ही विकासाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही : आ. सतेज पाटील यांची ग्वाही</p>

कोल्हापूर – ‘सर्वसामान्य लोकांनी सहकार्य करावं, आम्ही विकासाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही’, अशी ग्वाही आ. सतेज पाटील यांनी दिली. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आ. सतेज पाटील यांनी हातकणंगले गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.


 हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांनी काँग्रेसला संधी दिल्यास पाच वर्षातील प्रत्येक वर्षी काही ना काही भरीव काम करू यासाठी आमच्या उमेदवारांना मतदान करा, असं आवाहन त्यांनी केले आहे.