निवडणूक आयोगाला खरंच कळत नाही का? : आ. रोहित पवारांचा सवाल 

<p>निवडणूक आयोगाला खरंच कळत नाही का? : आ. रोहित पवारांचा सवाल </p>

मुंबई – सध्या राज्यात  दुबार मतदार यादीच्या घोळावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. असे असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘१ तारखेला लक्ष्मी येणार’ असं वक्तव्य केले आहे. या  या वक्तव्यावर आ. रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केला आहे. 
आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे कि, नगरविकास विभाग एवढा सक्षम असतानाही राज्यातील शहरं का भकास होतात आणि मग नेमका विकास कुणाचा होतो? या प्रश्नाचं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. ‘‘आपल्याकडं नगरविकास खातं आहे, त्यात माल आहे आणि १ तारखेला लक्ष्मी येणार,’’ या त्यांच्या विधानाचा अर्थ निवडणूक आयोगाला खरंच कळत नाही का? आता ‘माल’ही यांचा आणि निवडणूक आयोगाचे ‘मालक’ही हेच, मग निवडणुकीचं नाटक करून जनतेला वेड्यात काढण्यापेक्षा ज्याप्रमाणे सूरत-गुवाहाटी मार्गे खोक्याच्या माध्यमातून राज्याची सत्ता हिसकावली तसं आता नगरविकास विभागातील ‘माल’ वापरून नगरपरिषदेची सत्ताही खिशात घालावी.असा टोला आ. रोहित पवार यांनी लगावला आहे.