आजही जुन्या जखमा ताज्या होतात : खा. शरद पवार 

<p>आजही जुन्या जखमा ताज्या होतात : खा. शरद पवार </p>

मुंबई – आज २६/११ या दिवशी मुंबईवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याचं स्मरण खा. शरद पवार यांनी केले आहे. यावर त्यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मिडीयावर टाकली आहे.

खा. शरद पवार यांनी म्हटले आहे कि, ‘मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याला अनेक वर्षे उलटून गेले असले तरी, त्या धडकी भरवणाऱ्या दुर्दैवी प्रसंगाचं स्मरण केल्यानंतर आजही जुन्या जखमा ताज्या होतात. मुंबईकरांच्या रक्षणार्थ दहशतवाद्यांशी निकराने झुंज देताना आपले प्राण गमावलेल्या जिगरबाज जवानांना आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!’