अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट...
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी ट्रेल टेकच्या उद्घाटनासाठी एनसीसी महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी हे कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
या भेटीत कोल्हापूरमध्ये एन सी सीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर मराठा बटालियनच्या इतिहासालाही उजाळा देत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना शाहू नगरीत आल्याचा आनंद व्यक्त करत या मातीतच शौर्य असल्याच्या भावना त्यागी यांनी व्यक्त केल्या. यानंतर त्यागींनी कोल्हापूर गट मुख्यालयांतर्गत कार्यरत सर्व एनसीसी युनिटच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.