‘कमळाला मतदान करू नका, दुसरं कोणालाही...’
या माजी मंत्र्याने भर सभेत मतदारांना केलं आवाहन
सांगली - भाजपचे माजी सहकारी, माजी मंत्री असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जाणकर यांनी भर सभेत, “आई शपथ सांगतो कमळाला मतदान करू नका, दुसरं कोणालाही करा”, असे आवाहन मतदारांना केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील जतमध्ये उमेदवारांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. ‘भाजप हा जाती - जातीत भांडणं लावणारा पक्ष आहे’ असंही त्यांनी म्हटले आहे. महादेव जाणकर यांनी जाहीरपणे भाजपवर हल्लाबोल केल्याने उलट –सुलट चर्चांना उधाण आले आहे.