“ही गोष्ट माझ्यासाठी खुप धक्कादायक”: मंत्री पंकजा मुंडे
वरळी - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी काल आत्महत्या केली होती. या आत्महत्ये प्रकरणी स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात आल्याने मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे.
‘आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे’, असा आरोप गौरीच्या वडिलांनी केला आहे. यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे कि, “ही गोष्ट माझ्यासाठी खुप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजू शकते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे”