खासदार अन् आमदारांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी शासनाने जारी केलं परिपत्रक...
अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार
मुंबई – राज्यातील खासदार आणि आमदार जनतेचे प्रतिनिधित्व करत असतात त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक ही सन्मानपूर्व असावी, यासाठी शासनाने खास मार्गदर्शन तत्वांचे परिपत्रक जारी केले आहे.
राज्यातील खासदार आणि आमदारांना शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आदराची आणि सौजन्याची वागणूक द्यावी. त्यांचे काळजीपूर्वक ऐकून त्यांना तत्काळ मदत करावी, असे न झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे परिपत्रकात म्हटले आहे.