मालेगाव अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशी झाली पाहीजे : रूपाली चाकणकर
मुंबई – नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यावर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, “ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. आरोपीला अटक केली पण केवळ आरोपीला अटक करणे एवढ्यावर थांबले नाही तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकवर केस चालली पाहिजे ही आम्ही मागणी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा केला जाणार” असल्याचे म्हटले आहे.