‘...हे मुख्यमंत्र्यांना समजत नाही का?’ : शिंदे गटाच्या नेत्याचा घरचा आहेर
‘काय झाडी, काय डोंगर’ म्हणणाऱ्या नेत्याची खदखद आली बाहेर
सांगोला – राज्यात सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे सत्ताधारी गटातील अनेक नेते नाराज आहेत. त्यांची ही नाराजी आता हळूहळू समोर येत आहे. काय झाडी, काय डोंगर...या वक्तव्याने प्रसिद्ध असणारे शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत माझे आजारपण मी अंगावर काढल्याने ते कॅन्सर पर्यंत गेले आहे. लोकसभा निवडणूक सोडून जर मी उपचार घेतले असते, तर माझा आजार असा बिकट कॅन्सरपर्यंत गेला नसता. मात्र आपली जबाबदारी ओळखून मी उपचार घेणे टाळत लोकसभेचा प्रचार केला आणि भाजपला 15000 मतांचे लीड मिळवून दिले.
याच फळ म्हणून मला सांगोल्यात एकटे पाडले का? सांगोल्यात काय चाललंय हे मुख्यमंत्र्यांना समजत नाही का? हेच माझे दुःख आहे अशी भावना सांगोल्याचे शिवसनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली आहे.