नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री; 26 मंत्र्यांचा शपथविधी संपन्न...

<p>नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री; 26 मंत्र्यांचा शपथविधी संपन्न...</p>

 

पटणा - नितीश कुमार यांनी तब्बल दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या विजयांनंतर आज (दि.20) पाटण्यातील गांधी मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांच्या सोबत भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकूण 26 मंत्र्यांना राज्यपालांनी गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

नवीन मंत्रिमंडळात भाजपचे 14, जेडीयूचे 7, लोजपा (रामविलास)चे 2, तर हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) या दोन्ही पक्षांतून प्रत्येकी एक मंत्री समाविष्ट आहेत. जितन राम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन आणि उपेंद्र कुशवाह यांचे पुत्र दीपक प्रकाश यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, श्रवण कुमार, मंगल पांडेय, डॉ. दिलीप जायसवाल, अशोक चौधरी, लेसी सिंह, मदन सहनी, नितिन नवीन, रामकृपाल यादव, संतोष कुमार सुमन, सुनील कुमार, मोहम्मद जमा खान, संजय सिंह टायगर, अरुण शंकर प्रसाद, सुरेंद्र मेहता, नारायण प्रसाद, रमा निषाद, लखेंद्र कुमार रोशन, श्रेयसी सिंह, डॉ. प्रमोद कुमार, संजय कुमार, संजय कुमार सिंह आणि दीपक प्रकाश यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे.