घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या 'भाजप'कडूनच एका कुटुंबातील 6 उमेदवार
नांदेड – काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपने लोहा नगर परिषद निवडणुकीत एकाच कुटुंबातील तब्बल सहा सदस्यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना तर नगरसेवक पदासाठी त्यांच्या पत्नी, भाऊ, भावजय, मेव्हणा आणि भाच्याची पत्नी अशा सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत असलेल्या या निवडणुकीत सूर्यवंशी कुटुंबाचे वर्चस्व ठळकपणे दिसून येत असून “हीच का भाजपची घराणेशाहीविरोधी भूमिका?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.