...तर आम्ही एकाही राज्यातील बँका त्यांची कार्यालयं सोडणार नाही
केंद्र आणि राज्य सरकारवर रविकांत तुपकरांचा हल्लाबोल
नागपूर - मायक्रो फायनान्स बँकां शेतकऱ्यांना त्रास देत आहेत . जर बँका बेकायदेशीर वागत असतील तर आम्ही एकाही राज्यातील बँका त्यांची कार्यालयं सोडणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे.
आम्ही राज्यात बँका, फायनान्स, मायक्रो फायनान्स, आणि खाजगी बँका यांच्या विरोधात मोठं आंदोलन उभारणार आहे. याला सरकार जबाबदार असणार आहे. राज्यातील लाखो कुटुंबं दबलेली आहेत . एक लाख कर्ज घेतले तर दहा ते वीस लाख वसूल करतात. बँका ,फायनान्स, मायक्रो फायनान्स यांना कोणताही परवाना नाही.असं सांगून या पीडित कुटुंबांसाठी आम्ही राज्यात मोठ आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.