रब्बी हंगाम 2024 : पीकस्पर्धा निकाल जाहीर

<p>रब्बी हंगाम 2024 : पीकस्पर्धा निकाल जाहीर</p>

कोल्हापूर  : रब्बी हंगाम 2024 अंतर्गत राज्य सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या पीक स्पर्धा योजनेचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातून एकूण 83 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

➡️ राज्यस्तर व जिल्हास्तर निकाल (रब्बी 2024)...
1) रब्बी ज्वारी -
राज्यस्तर – द्वितीय : राजेंद्र देऊ बन्ने (ता. हातकणंगले, तारदाळ)
जिल्हास्तर – प्रथम : केरबा हरी माने (ता. कागल, कौलगे)
जिल्हास्तर – द्वितीय : संजय केशव पाटील (ता. हातकणंगले, तासगाव)
जिल्हास्तर – तृतीय : आप्पासो संभाजी भोसले (ता. करवीर, केर्ले)

2) हरभरा-
प्रथम : निलेश बाबासो उमाजे (ता. शिरोळ, अकिवाट)
द्वितीय : जगदीश विलास पाटील (ता. शिरोळ, राजापूर)
तृतीय : प्रकाश गणपती कोरे (ता. शिरोळ, अब्दुललाट)

3) गहू-
प्रथम : अविनाश विलास मगदूम (ता. हातकणंगले, घुणकी)
द्वितीय : सुरेश बाबासो बरगाले (ता. करवीर, सांगवडे)
तृतीय : शर्मिला शिवाजी पाटील (ता. करवीर, भुयेवाडी)

4) करडई-
जिल्हास्तर – प्रथम : विजय बाबुराव चौगेल (ता. शिरोळ, अर्जुनवाड)

बक्षीस रक्कम - 
➡️तालुका स्तर :
प्रथम – 5,000 रुपये 
द्वितीय – 3,000 रुपये 
तृतीय – 2,000 रुपये 

➡️जिल्हा स्तर :
प्रथम – 10,000 रुपये 
द्वितीय – 7,000 रुपये 
तृतीय – 5,000 रुपये 

➡️राज्य स्तर :
प्रथम – 50,000 रुपये 
द्वितीय – 40,000 रुपये 
तृतीय – 30,000 रुपये 

रब्बी 2025 मध्ये होणाऱ्या पीकस्पर्धा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केलंय.