...तेच इतरांची घरं फोडण्याचे काम करतायत: आ. सतेज पाटील यांचा घणाघात
कोल्हापूर – ‘जे स्वतःच्या ताकदीवर सत्ता मिळवू शकत नाहीत तेच इतरांची घरं फोडण्याचे काम करतायत’, अशी घणाघाती टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी शिवराज पाटील, विजयकुमार कांबळे, जयश्री कांबळे यांच्यासह शिवराज पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले कि, मुख्यमंत्री फडणवीस हे शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून पैसे मिळवण्यात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री मुलाला जमीन मिळवून देण्यात व्यस्त आहेत, तर दुसरे उपमुख्यमंत्री ठाकरेंची सेना फोडण्यात व्यस्त आहेत. राज्यातील तेरा कोटी जनता या तिघांचे आमच्याकडे कधी लक्ष जाईल या प्रतिक्षेत आहे.