...तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेन : अमित ठाकरेंची खळबळजनक पोस्ट
अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल...
मुंबई - नवी मुंबईतील नेरुळ परिसरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय अनावरण केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या 70 मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटले आहे कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल, तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेन!