शरद पवार पुन्हा कोठून निवडून येणार आणि कसे निवडून येणार...: आ. गोपीचंद पडळकर 

<p>शरद पवार पुन्हा कोठून निवडून येणार आणि कसे निवडून येणार...: आ. गोपीचंद पडळकर </p>

सोलापूर  – “शरद पवार यांची सध्याची राज्यसभा खासदारकीची मुदत पुढील सहा महिन्यांत संपत आहे,  10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार शरद पवार यांच्या खासदारकीवर बोट ठेवले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. 
शरद पवार यांची खासदारकी 2026 मध्ये संपत असताना आता ते पुन्हा कोठून निवडून येणार आणि कसे निवडून येणार? केवळ 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही. त्यामुळे मला त्यांची काळजी पडली आहे, असे म्हणत त्यांनी खा. शरद पवारांना टोला लगावला आहे.